C-02-A-Profiles-Site
अभिनेते मिलिंद फाटक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत.
मंगेश पाडगावकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.
निर्मलकुमार फडकुले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
रमेश राजाराम मंत्री
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली.
रमेश तेंडुलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले.
गझलकार सुरेश भट
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.