व्यक्ती-परिचय

वेधस पंडीत

Category:

 

वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला.

व्यक्ती-परिचय

विवेक पटाईत

Category:

 

श्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.

व्यक्ती-परिचय

विलासराव देशमुख

Category:

 

कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

व्यक्ती-परिचय

विलास संगवे

Category:

 

हे मुळचे सोलापुरचे असणार्‍या प्रा. डॉ. विलास सांगवे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि जैन समाज या विषयावर संशोधनात्मक प्रबंधक सादर करुन १९५० साली डॉक्टरेट संपादन केल्यावर सर्वप्रथम कर्नाटक महाविद्यालयात अध्यापन सुरु केलं, त्यानंतर राजाराम महाविद्यालय व पुढे शिवाजी कार्याचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली.

व्यक्ती-परिचय

विनायक महादेव दांडेकर

Category:

 

प्रा. वि. म. दांडेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते.

व्यक्ती-परिचय

विनोबा भावे

Category:

 

थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणापासूनच धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले.