अवर्गिकृत

वाचावेसे वाटले म्हणून – भाग 1

Category:

 

मी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?”

अवर्गिकृत

माझे सूचीलेखन कार्य

Category:

 

१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती.

अवर्गिकृत

आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

Category:

 

मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.

अवर्गिकृत

नाट्यक्षेत्राने केले माझे जीवन समृद्ध

Category:

 

माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो.

अवर्गिकृत

अनुभवांचे शब्द जाहले

Category:

 

मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’

अवर्गिकृत

बोलावेसे वाटले म्हणून

Category:

 

शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.)

अवर्गिकृत

नशिबाची व्याख्या

Category:

 

कळत-नकळत घडणा-या अनेक गोष्टिंचा भार शेवटि ”नशिब” नावाच्या ऐरणीवर येऊन आदळतो.माणसाच्या जीवनभ्रमंती मध्ये सुख-दुःखाच्या वळणावर ‘कधी हासु तर कधी आसु’ व्यक्त होत असतात.

अवर्गिकृत

हसावेसे वाटले म्हणून

Category:

 

तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले.

अवर्गिकृत

जहाजांची दुनिया

Category:

 

जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा.