अवर्गिकृत

ईश्वरी संकल्पना… उच्चशक्ती (बेवड्याची डायरी – भाग २०)

Category:

 

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे…….

अवर्गिकृत

संगीत, अभिनय, काव्य व इतर अवांतर ! (नशायात्रा – भाग २४)

Category:

 

तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते ,

अवर्गिकृत

मदत मागणे.. मदत घेणे ! (बेवड्याची डायरी – भाग १९)

Category:

 

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली …प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे ..

अवर्गिकृत

हॉस्पिटल मधून पलायन (नशायात्रा – भाग २३)

Category:

 

आई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ‘ मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ‘ असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे .

अवर्गिकृत

कृतज्ञता.. परस्परावलंबन (बेवड्याची डायरी – भाग १८)

Category:

 

प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या न कोणत्या कारणासाठी इतरांवर अबलंबून असते काही वेळा मानसिक दृष्ट्या तर काही इतर कारणांनी.. परस्परावलंबनाची ही जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात …ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले…

अवर्गिकृत

मुका झाल्याचे सोंग (नशायात्रा – भाग २२)

Category:

 

रागारागाने मी आतल्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले , मोठ्या भावाने ,मला ‘ ती जिवंत राहून काही फायदा नाही , त्यापेक्षा मरत का नाहीस , गाडीखाली जाऊन जीव दे ‘ असे म्हंटल्या मुळे माझा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता व आता मोठ्या भावाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे असे मला वाटत होते . त्याने केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला त्रास न होता कसा घेता येईल असा विचार मनात होता .

अवर्गिकृत

रविवारची सफाई.. टिवल्याबावल्या.. (बेवड्याची डायरी – भाग १७)

Category:

 

आज रविवार म्हणून सकाळी कोणाला लवकर उठवले गेले नव्हते ..एक तास उशिरा सगळे उठले ..रविवारी पी.टी…आणि इतर थेरेपीजना सुटी असते हे कालच समजले होते मला ..काल रात्री आमच्यासाठी ‘ डँडी ‘ या सिनेमाची सीडी लावण्यात आली होती ..एक मध्यमवयीन दारुड्याची कथा छान दाखवली गेली होती ..अनुपम खेर ने दारुड्या व्यक्तीची घालमेल ..दारूची ओढ ..कुटुंबियांचेप्रेम ..या कात्रीत सापडलेली व्यक्तिरेखा छान वठवली होती .. सिनेमा पाहताना अनेकदा मला माझ्या मुलीची आठवण झाली ..वडिलांना सुधारणेसाठी प्रेरणा देणारी ..वडिलांवर खूप प्रेम असलेली तरुण मुलगी पूजा भट्ट ने तंतोतंत साकारली होती

अवर्गिकृत

आत्महत्येचे नाटक (नशायात्रा – भाग २१)

Category:

 

माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे .