अवर्गिकृत

भावानुबंधाची पुनर्भेट

Category:

 

कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते.

अवर्गिकृत

बालगंधर्व रंगमंदिराची रंजक गोष्ट

Category:

 

चित्रपट निर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा….’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते.

अवर्गिकृत

पिरॅमिडसच्या देशात

Category:

 

१०-१२ वर्षापूर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर, हॉटेलमध्ये, चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या.

अवर्गिकृत

जपानमधील अप्रतिम साकुरा

Category:

 

भारताच्या पूर्वेला अगदी चिंचोळा, चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला देश. हिमालयाच्या काही शिखरांशी स्पर्धा करू पाहणारा माउंट फुजी सारखा पर्वत, ‘लेक अशी’ सारखी विस्तीर्ण व निर्मळ तळी, पॅगोडा सारख्या उतरत्या छपरांच्या वैशिष्ठ्यपूर्ण इमारती, रस्त्याचे चढउतार, त्यावरून लगबगीने चालणारी मध्यम उंचीची गोरीपान चपट्या नाकाची माणसे….. कायकाय अन् कशाकशाचं वर्णन करावं…पण त्यातही तिथल्या चेरीब्लॉसमच्या वर्णनांनी मनावर भुरळ घातली

अवर्गिकृत

कशासाठी पोटासाठी!

Category:

 

कॉर्निश ‘ हा शब्द इथे येईपर्यंत माझ्या शब्दकोषात आलाच नव्हता. इंग्रजी/फ्रेंच भाषेतला ‘डोंगराच्या जवळून जाणारा रस्ता ‘ हा अर्थ इथे अजिबात लागू होत नाही, पण अरबी भाषेप्रमाणे जमिनीत आतपर्यंत घुसलेला समुद्राचा भाग हाच अर्थ इथेतरी जास्त योग्य वाटतो. विमानातून खाली दुबईकडे झेप घेतानाच दिव्यांच्या रेखीव चमकणाऱ्या रेघेच्या रूपात ह्या कॉर्निशची पहिली सलामी मिळते.

अवर्गिकृत

अडथळ्यांची शर्यत

Category:

 

शेवटी सगळे अडथळे पार करून रात्री जाण्याचे नक्की झाले. त्यावेळी भांडूपमध्ये आमच्या घरी फोन नव्हता. त्यामुळे ह्यांच्याकडून आलेल्या एकमेव अस्पष्ट ऐकू आलेल्या फोनवर व त्यांनी दिलेल्या फ्रान्सच्या विमानतळाच्या माहितीवर काम चालवायचे होते. त्यातच माझे मधले ३ दिवस घरच्या अडचणींमध्ये वाया गेले होते. महिनाभर रहायचे होते, जरी तिकडे उन्हाळा होता, तरी आमच्यासाठी ती थंडीच! त्यामुळे गरम कपडे, खाण्याचे भरपूर पदार्थ…. बापरे…यादी संपतच नव्हती. आठवून आठवून सामान गोळा होत होते. कसेबसे सगळे कोंबले गेले.

अवर्गिकृत

संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

Category:

 

प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो.