अवर्गिकृत

स्त्री प्रतिमा

Category:

 

अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत.

अवर्गिकृत

मंतरलेले दिवस – भाग १

Category:

 

ग्रामीण जीवन यावर माहिती. आता लोक गुरे पाळत नाहीत. दाढ भाजत नाहीत. काही लोक तर शेतीच करत नाही. एके काळचे वैभव लयाला जात चालले आहे.

अवर्गिकृत

हुसेन, दाली आणि रझा – रेषेच्या तीन बाजू

Category:

 

चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही.

अवर्गिकृत

कटकटी

Category:

 

जीवन म्हणजे जशी कटकटीची मालिकाच होय.अडचणी, अडथळे पार करतच मार्गक्रमण करावे लागते.कोणतेही कार्य सुरळीत पार पडत नाही.सततची परवड हतबल करते.सहज सोपे वाटणारे काम देखील अडथळ्यांविना पूर्ण होत नाही.

अवर्गिकृत

खरा गुरु

Category:

 

खूप शिकलेल्या व्यक्तीला पाश्चात्य देशात ‘वेल-रेड’ (खूप वाचलेला) म्हणतात. तर भारतीय संस्कृतीत बहुश्रुत (खूप ऐकलेला).
छापखान्यांची सोय नव्हती, विद्या गुरुमुखातून शिष्याला मिळायची आणि ऐकून, पाठ करूनच ती जपली जायची तेव्हाची ही संज्ञा. म्हणून विद्वान माणसाला बहुश्रुत’ म्हणत असतील कदाचित.

अवर्गिकृत

अभियंता

Category:

 

मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला,

अवर्गिकृत

शक्ती संस्कारांची, आदर्शाची !

Category:

 

सकाळी उठताना दोन्ही हातांचे तळवे समोर ठेवून आई म्हणायला सांगायची, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूलेतु गोविंद, प्रभाते करदर्शनम् । जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करायचा. त्यानंतर वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।’ असं म्हणून उठायचं.

अवर्गिकृत

शुभं करोति

Category:

 

तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची.

अवर्गिकृत

पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा

Category:

 

आजच्या दिवशी पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची आठवण आलीच पाहिजे…स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवंद्र शर्मा तर आईचे नाव तृप्ती शर्मा असे आहे. राकेश शर्मा यांचा जन्म झाल्यावर त्यांचे आईवडील आंध्र प्रदेश येथील हैद्राबाद शहरामध्ये रहाण्यास गेले.