अवर्गिकृत

लेकास नको पॉकेटमनी, हवा पगार..!

Category:

 

   मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले.

अवर्गिकृत

करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ

Category:

 

ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे.

अवर्गिकृत

अपेक्षांच्या ओझ्याखाली

Category:

 

एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्या् नवर्या पासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्या चदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी.

अवर्गिकृत

भाषा आणि आपण

Category:

 

एका तरूणीला दुसर्‍या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली.

अवर्गिकृत

आम आदमी पार्टी – एक पर्याय

Category:

 

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्‍या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ?

अवर्गिकृत

फ्री ओपनर – एक चमत्कार !!

Category:

 

फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना एम एस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे.

अवर्गिकृत

सामाजिक बांधिलकी जपणारी – “फ्रीमेसनरी”

Category:

 

“जगात अनेक सामाजिक संस्था अशाही आहेत ज्या कित्येक वर्षापासून कोणताही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता केवळ मानवतेच्या हितासाठी तसंच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहेत. “फ्रीमेसनरी” ही ५०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झालेली आणि भारतात २५० वर्षापासून कार्यरत असलेली सर्वधर्मसमभाव मानणारी आणि समाजहितासाठी तत्पर असणारी संस्था. या संस्थेच्या कामाचं स्वरुप, उद्दिष्टांविषयी माहिती करुन देण्यासाठी नुकतंच मुंबईतल्या फोर्ट येथील “फ्रीमेसन हॉल” येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने भारतात ”फ्रीमेसनरी” चं समाजकार्य कशाप्रकारे सुरु आहे त्याचा हा वेध.”

अवर्गिकृत

लग्न आणि आपला समाज

Category:

 

काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय एखाद्या तरूणीने घेतल्यास लोक नाक मुरडतात.