वेगळा (कथा) भाग ३
Category:
कथा साहित्य - ललितदुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”
July 13, 2022
Category:
कथा साहित्य - ललितदुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”
July 13, 2022
Category:
साहित्य - ललित“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.”
रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते.
“होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान पटवून दिले होते.”
July 12, 2022
Category:
साहित्य - ललित“अरे तुमच्या औषधांनी मिस्त्रीशेट चांगला बरा झाला. करसनची मात्र झाली ” पंचाईत. त्याचे सर्व रंगढंग बंद पडले. बापाची अफाट संपत्ती आणि हे दिवटे एकुलते एक चिरंजीव. अत्यंत उधळ्या. त्यात पोरी फिरवणे, पाटा, जुगार आणि कसले कसले नाद. बाप लेकाची रोज भांडणे व्हायची. खूप आरडाओरडा व्हायचा. अख्ख्या ससेक्स रोडचा तो एक चर्चेचा विषयच झाला होता. शेवटी कंटाळून कंटाळून शेटनी करसनला इस्टेटीचा अर्धा वाटा काढून दिला आणि करसन वेगळा राहू लागला. पण त्याच्या सारख्या कर्मदरिद्री माणसाला कितीही पैसा कसा पुरावा? काही वर्षातच कफल्लक होऊन तो परत आला. शेटनी त्याला घराबाहेर काढला. पण त्याची आई मधे पडली म्हणून शेटनी त्याला परत घरात घेतला. थोडे दिवस बरे गेले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
July 8, 2022
Category:
साहित्य - ललितआजोबांनी करसनकडे फक्त एकदाच पण रोखून पाहिले. काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेनेच करसनला जणू कोणी कानफटात मारल्यासारखे वाटले असावे. तो लगेच तिथून पसार झाला.
मिस्त्रीशेटही पहात राहिले, म्हणाले, “अरे आजोबा, मला माफ करा. हे आमचा डिकरा हाये ने करसन, लय खराब हाये. माझ्या मरणाची वाट पहाते साला.
माझा लोखंडनो मोठा धंदा हाये. लय इस्टेट हाय. ते समदे तर याचेच हाय. पन पैसा उडवायचे अने पोरी लोक फिरवायचे ये परीस साला दुसरा काय कामधंदा नाय करीत. नाय तर नाय पन माला, मालाबी काय वाट्टेल ते बोलते. ते पन ठीक हाय पन साला तुमाला बोलते ते माला नाय आवरले. साला मेहमानाला असा बोलते काय? मला माफ करा.’
July 7, 2022
Category:
कथा साहित्य - ललितसर्व पात्रे आणि कथानक काल्पनिक असून ही कथा कुठे मिळतीजुळती निघाल्यास तो योगायोग समजावा.
July 7, 2022
Category:
साहित्य - ललितगोष्ट सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझ्या वडिलांची बदली झाली त्यावेळची. बदली झाल्यावर नाशिकहून आम्ही मुंबईला आलो. वडिलांना भायखळ्याला राणीच्या बागेजवळ, आता तिला जिजामाताबाग म्हणतात, ससेक्स रोडला मिस्त्री बिल्डिंगमध्ये सरकारी जागा मिळाली.
जागा कसली? एक दुमजली बंगलेवजा घराचा १ल्या मजल्यावरचा अख्खा अर्धा भागच होता तो! दोन मोठे प्रशस्त हॉल. तसंच मोठं स्वयंपाकघर. उंची चांगली बारा पंधरा फूट. मंगलोरी कौलं. तिन्ही बाजूंनी आठ दहा फूट रुंद प्रशस्त व्हरांडा. अगदी राजेशाही थाट! त्याच रस्त्यावरून म्युझियम ते राणीचा बाग अशी एक छोटीशी ट्रॅम गाडी पण यायची. आम्हाला तर फार मजा वाटायची. रात्री राणीच्या बागेतल्या वाघ-सिंहाच्या डरकाळ्या पण ऐकू यायच्या. एखाद्या गव्हर्नरच्या बंगल्यासारखाच थाट होता. नंतर समजले की पूर्वी तो बंगला म्हणजे जर्मन कॉन्सुलेटरचे ऑफिसच होते. आता तो मिस्त्री नावाच्या एका पारशाने विकत घेतला होता.
July 6, 2022
Category:
साहित्य - ललितखंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे.
मी एक साधा मध्यमवर्गीय निवृत्तीनाथ! म्हणजे एक निवृत्त बँक कर्मचारी, आमच्या बँकेत निवृत्त होणाऱ्यांना निवृत्तीनाथ म्हणावयाची पद्धत. अशा आजपर्यंत निवृत्त झालेल्यात माझा नंबर होता १०८ म्हणून मला सगळे म्हणतात श्री श्री १०८ निवृत्तीनाथ! जसे जैन साधू असतात ना, श्री श्री १००८ स्वामी अमुकतमुक वगैरे, तसे. म्हणजे मी काही तसा कोणी साधू बिधू नाही बरं का.
July 5, 2022
Category:
साहित्य - ललितलेण्यांची उंची आणि खोलवर उतरणाऱ्या पायऱ्यांकडे आता कुठे मनोजसरांचे लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची चलबिचल सुरू झाली, ते परतायची घाई करू लागले, म्हणाले, “अरे, तो भत्ता बित्ता राहू द्या आता, आपण आधी खाली उतरू. मग निपट निरंजनच्या मठात हवं तर खाऊ भत्ता, पण आता निघायचं. चला चला!’
July 3, 2022
Category:
साहित्य - ललितमालशे मॅडम म्हणजे आमच्या फिजिकल ट्रेनर आणि स्पोर्टस् विभाग प्रमुख. खूप सिनियर. पण उत्साह दांडगा. ट्रेकिंग कँप, पिकनिक वगैरे प्रोग्रॅम त्यांच्या खास आवडीचे. विद्यार्थ्यांमध्ये जाम पॉप्युलर. पण दिवाळीच्या सुटीमध्ये त्यांचे येणे जरा अवघडच वाटत होते. आमची योजना बारगळते की काय असे वाटले. पण त्या लगेच तयार झाल्या. अर्थात त्या आल्यामुळेच आमच्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता होतीच. पण ते पुढचे पुढे. आता आमची योजना ‘स्थळ’ पक्क होणे या टप्प्यावर होती आणि तो टप्पा आम्ही विनासायास गाठला होता. मालशे मॅडमचा अडसर कसा दूर करायचा ते ठरवायला आमच्याकडे खूप वेळ होता. आताच कशाला काळजी? अर्थात त्यांच्या येण्याने मनोजसरांच्या चाळ्यांना थोडा आळा बसणार हेही खरे होतेच. मी ग्रुपला म्हणाले, “अरे सध्या परवानगी तर मिळाली. त्यातून कसा मार्ग काढायचा ते पाहू. अजून आठ दहा दिवसांचा अवधी आहे. पाहू, काहीतरी मार्ग सापडेलच.’
July 2, 2022
Category:
साहित्य - ललितदोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना.
मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, तू आर्ट स्कूलमधे कॅलीग्राफी शिकतेस. तू एक काम करायचं. अरूच्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर काढून एक चार ओळीचं पत्र तयार करायचं. त्यासाठी जाडा भरडा ड्रॉइंग पेपर वापर.
July 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti