लेखसंग्रह

एकेरी पालकत्वाचे आव्हान

Category:

 

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का?

लेखसंग्रह

मुले हिंसक बनतात तेव्हा…

Category:

 

विषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना…!

लेखसंग्रह

मुंबईची दैना

Category:

 

आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?

लेखसंग्रह

कायद्याचे विद्यार्थी, न्याय आणि भ्रष्टाचार

Category:

 

नुकतीच एक बातमी वाचली की पुण्याच्या एका प्रसिध्द संस्थेत कायदा शिकणार्‍या मुलांनी एका मुलाचे रॅगिंग केले त्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्या मुलाच्या पाठीवर ‘माझे वडील पोलीस आहेत आणि ते गैरमार्गाने पैसे मिळवतात’ अशी पाटी लिहुन त्याला सगळीकडे हिंडवण्यात आले त्यामुळे त्याने आत्महत्या केली. हे सर्व धक्कादायक होते. पण यातून बरेच प्रश्नही निर्माण होतात.

लेखसंग्रह

जागो ये मुर्दों का गांव !

Category:

 

संपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्‍या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे.

लेखसंग्रह

निवडणूका आटोपल्या – सरकार आलं – पुढं काय?

Category:

 

येणार्‍या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे.