व्यक्ती-परिचय

मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

Category:

 

समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

व्यक्ती-परिचय

प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर

Category:

 

काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं.

व्यक्ती-परिचय

लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे

Category:

 

तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

व्यक्ती-परिचय

निसर्गकवी माधव केशव काटदरे

Category:

 

हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.

व्यक्ती-परिचय

ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन

Category:

 

संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला.

व्यक्ती-परिचय

माझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर

Category:

 

पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली.

व्यक्ती-परिचय

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

Category:

 

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो.

व्यक्ती-परिचय

प्रेरणा

Category:

 

अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट  व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे.

व्यक्ती-परिचय

भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे

Category:

 

आबासाहेब गरवारे यांना नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.

व्यक्ती-परिचय

बिरादरीची माणसं – गोविंद काका

Category:

 

असे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!