25-M-vyakti-parichay-B
बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा.
डॉ श्रीकांत जिचकार…. वकिल, डॉक्टर ,आयपीएस, आयएएस +++
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
थोर समाजसेवक बाबा आमटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसमाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता.
चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते.
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमाजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण झाले. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या.
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे.