गायक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला.