अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले
व्यक्ती-परिचय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले

Category:

 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली.

व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार

Category:

 

विदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. ते १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आमदार झाले.

व्यक्ती-परिचय

लेखक केशव मेश्राम

Category:

 

१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

व्यक्ती-परिचय

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक बाळासाहेब भारदे

Category:

 

स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.

व्यक्ती-परिचय

अध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा

Category:

 

पुट्टपर्ती येथे ईश्वराम्मा आणि पेद्दवेंकम्मा राजू रत्नाकरम या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले सत्यनारायण राजू. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला. वरवर पाहता अतिशय थोतांड वाटत असल्या, तरी जगभरातील २०० देशात वसलेल्या कोट्यावधी साईभक्तांची या कथेवर मनापासून श्रद्धा आहे.

व्यक्ती-परिचय

अणूरसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. हरी जीवन अर्णीकर

Category:

 

रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते.

व्यक्ती-परिचय

दैनिक नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर

Category:

 

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे

Category:

 

Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे

Category:

 

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र सदाशिव भट

Category:

 

नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.