व्यक्ती-परिचय

आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

Category:

 

त्यांच पहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसरे नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव जगन्नाथ परांजपे

Category:

 

सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत

Category:

 

दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.

व्यक्ती-परिचय

जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे कुरेशी

Category:

 

गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी रामनाथ थरवळ

Category:

 

त्यांच्या कार्यशाळेतून शिकून गेलेल्या कलाकारांची यादी तशी मोठी आहे. विद्या बालन, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, सुमित राघवन, पंकज विष्णू, रसिक ओक जोशी, विशाखा सुभेदार, अतुल काळे, तारका पेडणेकर, दिपक वीज, बॉबी वीज ही त्यातली काही नावे.

व्यक्ती-परिचय

संगीतकार बाबला शहा

Category:

 

मराठी माणसांची ‘डिस्को दांडिया’शी जानपहचान करून दिली ती याच बाबला शहा यांनी. दोन काठ्या घेऊन तलवारबाजी केल्यागत नाचणाऱ्या तरूण पिढीला नवरात्रीत दांडियात शिस्तबद्ध कसं नाचायचं याचं बाळकडू मिळालं या बाबलांच्यामुळे.

व्यक्ती-परिचय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

Category:

 

जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

व्यक्ती-परिचय

माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर

Category:

 

सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.

व्यक्ती-परिचय

राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी)

Category:

 

अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

भूशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर

Category:

 

सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.