व्यक्ती-परिचय

लेखक विश्वास पाटील

Category:

 

इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

व्यक्ती-परिचय

मराठीतला पहिला रॉक स्टार नंदू भेंडे

Category:

 

ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.

व्यक्ती-परिचय

पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

Category:

 

गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

व्यक्ती-परिचय

अभिनेते संजय जोग

Category:

 

रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती.

व्यक्ती-परिचय

दासगणू महाराज

Category:

 

त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात.

व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा देव

Category:

 

त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलाल दर्डा

Category:

 

बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे.

व्यक्ती-परिचय

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना

Category:

 

मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी ९१ मॅचेस खेळत ३४ गोल्स केले होते आणि चार वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी मैदानात असे काही प्रदर्शन, गोल्स केले जे आजही सर्वांच्या लक्षात आहेत.

व्यक्ती-परिचय

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

Category:

 

महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर यशवंतराव चव्हाण हे नेता होते, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव चव्हाण अभिजात साहित्यिक होते. मराठी भाषेचा एक नम्र व रसिक वाचक या नात्याने त्यांनी नेहमीच मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा आदर केला आहे. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर

Category:

 

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.