लेखसंग्रह

त्रिमोतींची ओटी

Category:

 

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.

साहित्य - ललित

प्रेमवेडा

Category:

 

एखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं.

साहित्य - ललित

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

Category:

 

मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते…   ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा ….

लेखसंग्रह

भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!

Category:

 

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.

लेखसंग्रह

या ज्येष्ठांना एक सलाम

Category:

 

काही (असामान्य) करण्याची, नवनवीन गोष्टी शिकत, स्वतःला समृद्ध करत राहण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा, त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक तडजोड, आणि आपल्या (अविश्रांत) जबाबदाऱ्यांमधून घेतलेली (तात्पुरती का होईना) जाणीवपूर्वक निवृत्ती. हे सगळं खूप खूप जास्त matter करतं जेव्हा सादरकर्ते ‘बाल’ नसतात. लहानपणी जमलं नाही तरी काय झालं, आयुष्यात जेंव्हा मला वेळ मिळतोय, सवड काढता येतेय, तेंव्हा तेंव्हा मी स्वतःसाठी झटेन, ही अत्यंत आदर्श बाब वाटते मला!

लेखसंग्रह

मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा !

Category:

 

कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा .

साहित्य - ललित

प्रभो शिवाजी राजा – उत्तरार्ध

Category:

 

खरे तर शिवरायांबद्दल “अगदी थोडक्यात” असे काहीच लिहिता येणार नाही, परंतु लेखन सीमेची मर्यादा पाळणे हे देखील अनिवार्यच असते, म्हणून मला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं सांगू ! लेखनसीमेचे भय हे एक निमित्त पण अखंड महासागराला कधी कोणी ओंजळीत भरून घेऊ शकले आहे काय ? 

साहित्य - ललित

ती पहिली रात्र

Category:

 

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!!

साहित्य - ललित

प्रभो शिवाजी राजा – पूर्वार्ध

Category:

 

शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज.