साहित्य - ललित

न्याय ? (कथा)

Category:

 

चंदनपुर हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध होत. शहरात अनेक शिक्षण संस्था होत्या. आजू बाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी चंदनपुरमधे येत असत. विविध शाखांमधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर एक मोठे होस्टेल होते. होस्टेलची पाच मजली इमारत आता जुनी झाली असली तरी लिफ्ट आदि सोयीनी युक्त होती. मात्र ही इमारत शहरापासुन दूर आणि तशी एकाकी होती.

लेखसंग्रह

घर असावे…

Category:

 

आधुनिक होत जाताना माणसांच्या घराचे हॉटेल कधी होऊ लागलं हे लक्षात आलं नाही. सुविधा आल्यात पण शांती गेली. सुख आलंय पण समाधान गेल. कारण सुविधा आणण्याच्या प्रयत्नात जी धावपळ केलीय तिची भरपाई कशी आणि कुठुन करणार. अलिकडच्या काळात घर श्रीमंत झालीत… पण माणसांच काय झालं ?

लेखसंग्रह

चला बदल घडवू या…

Category:

 

सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही.

साहित्य - ललित

काळाचा पडदा

Category:

 

काळाचा हा पडदा इतका गडद, गहिरा आहे, पण तो न दिसणाराही आहे… आपण उद्या कधीच पाहू शकत नाही.. ओशो रजनीश म्हणतात, ‘आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हे कल थी…!’

साहित्य - ललित

झडी आठवणींची

Category:

 

आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते.

साहित्य - ललित

जीवनरंग

Category:

 

जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो.

लेखसंग्रह

कोरोना – मृत्यू वादळ

Category:

 

आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे.

साहित्य - ललित

हेल्पलेस

Category:

 

अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे.

लेखसंग्रह

माझं घरटं

Category:

 

एक चिमणी एका शहरात रहात होती. तिच्या सोबत तिची मुलगी, म्हणजेच छोटी चिमणी (चिऊताई) सुद्धा होती. कधी एखाद्या बिल्डिंगच्या खिडकीच्या कोपर्‍यात त्यांचा निवास असायचा, तर कधी एखाद्या पाईपमध्ये.