साहित्य - ललित

लाखाची पैज…

Category:

 

जगात अनेक जण पैजा लावत असतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. पण दोन मित्रांनी आपल्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत अशी एक आगळीवेगळी पैज लावली आणि ती पुर्णही केली. जी, शिक्षणाचे स्वप्न अर्धेवट राहीलेल्या अनेक तरूणं-तरूणींना शिक्षणाची नवउमेद आणि प्रेरणा देईल.

साहित्य - ललित

आरोग्य व्यवस्थेचा हुsर्रेव

Category:

 

ही गोष्ट फार जुनी असून पूर्ण आठवत ही नाही तशी. पण जे मनात ठसतं ते मात्र आपण कधीच विसरु शकत नाही. वर्षानुवर्षे ते तसंच दिसतं डोळ्यासमोर. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला सर्वांनाच आवडतं. कित्येक माणसं आपलं बालपण वारंवार आठवत आठवत च जगत असतात. इतरांना ते सांगत असतात. ते सांगताना व आठवताना खूप गंमत वाटते.

साहित्य - ललित

न संपणारा प्रवास…

Category:

 

आपण वेगवेगळ्या राज्यात जन्माला आलो तरी आपली मातृभूमी तर एकच आहे ना, एकाच मातृभूमीची आपण लेकरे आहोत मग हा परकेपणा का?? आपल्या देशातील नयनरम्य निसर्गाला टिपण्यासाठी विदेशातून लोकं इथे येतात मग आपण का आपली संस्कृती, निसर्ग सोडून बाहेरच्या देशात फिरायला जातो, त्यातच फक्त आपलं राज्य आणि आपली माणसं ही मानसिकता संपायला पाहिजे. आपला देश आपली माणसं अस व्हायला हवं तेव्हा कुठे आपल्यात एकता निर्माण होईल.

साहित्य - ललित

बाकावरचे दिवस

Category:

 

पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे.

लेखसंग्रह

लढवय्या बापाचा शेवट

Category:

 

… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ???

साहित्य - ललित

खोलवर रुजलेल्या ‘वेदना’

Category:

 

देवा, हे लपंडावाच दुष्टचक्र पुरे झालं आता. माझे कान आसुसलेत ‘आई’ अशी हाक ऐकण्यासाठी. मी पुन्हा वाट पाहिन तुझ्या येण्याची. मी पुन्हा स्वप्न रंगवणार तुझ्यासाठी. पण पुन्हा येवून जाऊ नकोस. आता पुन्हा आम्हाला सोडून जाऊ नकोस!

साहित्य - ललित

पर्यटकांचं आकर्षण – कॅपिलानो ब्रीज

Category:

 

निसर्गाच्या विविध चमत्काराबरोबरच कॅनडातील मानव निर्मित कलाकौशल्ये पाहून आम्ही भाराऊन गेलो. विज्ञानाची कास धरत मानवाने केलेले अदभुत चमत्कार थक्क करून सोडणारेच होते. कॅपिलानो ब्रीज हे त्यापैकीच एक ! कॅपिलानो ब्रीज म्हणजे मानवी कौशल्याचा अद्भुत चमत्कार असल्याची अनुभूती आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर झाली. मती गुंग करणारीच ही स्थापत्य कला आहे. तिथले दृश्य पाहून निसर्गाच्या किमयेचे नि त्यात भर घातलेल्या कृत्रिम कल्पकतेचे कौतुक वाटले. कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज, ट्रीटॉप्स अँडव्हेंचर आणि रोमांचक नवीन क्लिफवॉक अशा तीन चित्तथरारक सौंदर्याने मन भारावून गेले.

साहित्य - ललित

भुविका…

Category:

 

मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत……

साहित्य - ललित

कुकर…

Category:

 

आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात.

साहित्य - ललित

जाणिवांची अंतरे (कथा)

Category:

 

भाऊ आणि माझी ओळख साधारण दहा वर्षापूर्वीची. त्या वेळी मी नुकताच वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला फारशी काम मिळतच नसत. कामाचा शोध हाच खरा व्यवसाय असायचा. एक दिवस कोर्टात रिकामा बसलो असताना भाऊ माझ्या टेबल समोर येऊन उभा राहिला. त्याला कुणाची तरी जमानत करायची होती. पण त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मी हे काम सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावं, असा त्याचा आग्रह होता.