साहित्य - ललित

माझे खाद्यप्रेम – २

Category:

 

साधारणपणे ज्या लोकांना चवीने वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय आहे त्यांना खाऊ घालण्याची सवय सुद्धा असते, किंबहुना ती असावी. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात एक वेगळीच मजा आहे अर्थात ती स्वत: अनुभवावीच लागते, तिचा देखावा करून चालत नाही. तस पाहिलं तर आज जग खूप पुढे गेलय त्यामुळे आज अनेक जणांना जेवण करता आलच पाहिजे ही बाब पटेनाशी झाली आहे. स्वतःचा चहा देखील करता न येणारी आज समाजात अनेक माणसे आहेत. अर्थात त्यांना ह्या गोष्टीची लाज नव्हे तर भूषण वाटत.

साहित्य - ललित

गजर…

Category:

 

आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’,  कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो..

साहित्य - ललित

कॅनडातील भारत

Category:

 

कॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून गेल्या. परंतु जिथे जाईन तिथे माझं मन कांही तरी शोधीत होतं. नेमक काय हे उमगत नव्हत; परंतु पुढे हळुहळू सारं माझ्या लक्षांत आलं. ते कॅनडातील भारत शोधीत होतं.  मी कॅनडातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी एखाद-दुसऱ्या भारतीय कुटूंबाची हमखास भेट व्हायची. तसा कॅनडा हा संमिश्र संस्कृतीचा देश आहे. नवे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका खंडातील विस्तारने सर्वात मोठा असलेल्या या देशात जगातील विविध देशांच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. येथे निर्विवादपणे गोऱ्या… इंग्रजांचे वर्चस्व असले तरी चीनी व भारतीयांची संख्या निश्चितच नगण्य नाही.

साहित्य - ललित

एखादी स्मित रेषा

Category:

 

तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या  चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्‍यावर  प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात.

साहित्य - ललित

माझे खाद्यप्रेम – १

Category:

 

स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. अर्थात ह्यामध्ये करणं आणि खाणं असे दोन प्रकार पडतात. अर्थात दोनही प्रकार मला नेहमी आवडतात. पण शेवटी त्यातील दुसरा प्रकार माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे. विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी माझी जीभ सदैव आतुर असते. म्हणजे तिखट, गोड, कडू, आंबट, तुरट , खारट अशा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर आले की तोंडाला पाण्याची खळखळती धार सुरू होते.

लेखसंग्रह

रोजनिशी

Category:

 

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत.

साहित्य - ललित

पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय

Category:

 

2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’!

लेखसंग्रह

विज्ञान मराठी : पारिभाषिक संज्ञा

Category:

 

रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे.