साहित्य - ललित

त्या रात्रीचा थरार

Category:

 

माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते.

साहित्य - ललित

हे चित्र कधी बदलणार ?

Category:

 

गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला.

साहित्य - ललित

लेबल

Category:

 

एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला.

साहित्य - ललित

पोलिसांची प्रतिमा

Category:

 

स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते.

साहित्य - ललित

असाही पोलिसांचा वापर… दृढ विश्वास पोलिसांवरचा

Category:

 

आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो.

साहित्य - ललित

एकाकीपणा

Category:

 

पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

साहित्य - ललित

मातृदिन

Category:

 

मुलींच्या शाळेत मातृदिनाची लगबग चालली होती. मुली, शिक्षिका सगळेच उत्साही होते. सगळ्यांनी मिळून शाळा स्वच्छ केली. जिकडे तिकडे आरास केली. आजचा दिवस आईला वंदना देण्याचा होता. सगळ्यांची उत्सुकता ही होती की मुख्याध्यापिका कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविणार.

साहित्य - ललित

गम्मत एका देवळातील

Category:

 

गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते.

साहित्य - ललित

गुलाबी रिबिन

Category:

 

एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते.

लेखसंग्रह

मृत्युंजय स्वा. सावरकर

Category:

 

दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्‍ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते.