लेखसंग्रह

संयमाची परीक्षा

Category:

 

दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना!

साहित्य - ललित

‘टेक इट ईझी’ पॉलिसी (माझी लंडनवारी – 34)

Category:

 

अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त  नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले.

साहित्य - ललित

मानसिक स्वास्थ्य, तथ्य आणि पथ्य….

Category:

 

मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही.

साहित्य - ललित

सब कुछ सिखा हमने

Category:

 

कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती.

साहित्य - ललित

गगन विहार’ ओळखीचा! (माझी लंडनवारी – 33)

Category:

 

प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते.

साहित्य - ललित

पुनरागमनायच अर्थात London  once again! (माझी लंडनवारी – 32)

Category:

 

मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं?  नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.

साहित्य - ललित

गप्पांची पायरी

Category:

 

लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या.

साहित्य - ललित

गगन ठेंगणे! – उत्तरार्ध (माझी लंडनवारी – 31)

Category:

 

अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते.

साहित्य - ललित

सांगता (माझी लंडनवारी – 30)

Category:

 

एअरपोर्टवरचे सर्व सोपस्कार एखाद्या सरईतासारखे पार पाडले. माझं फ्लाईट दुपारी  २-२.१५ च होतं. हातात आता बऱ्यापैकी वेळ होता. मग मी शॉपिंग करावं ह्या हेतूने वेगवेगळी दुकाने फिरले. तिथल्या किमती ऐकून ‘दुरुन डोंगर साजरे. बसा आहे तिथेच’असं म्हणत मी लांबूनच राम राम केला.

साहित्य - ललित

भोगीची शिकवण

Category:

 

माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून..