आंतरराष्ट्रीय योग दिन
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितवटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही.
Category:
साहित्य - ललितइयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.
Category:
साहित्य - ललितजेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे.
Category:
साहित्य - ललितकाळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत.
Category:
साहित्य - ललितमनात आलं .. हे आपले पद आणि पदव्या मिरवणारे शिकलेले असतील , सावरलेले नव्हेत. इतरांना सावरून घेणे ज्यांना जमते त्यांना सावरलेले म्हणावं. हे प्रचंड शिक्षित असतील पण सुशिक्षित निश्चितच नव्हेत.
Category:
साहित्य - ललितधान्याला सूप… धान्य निवडणे. फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात…
Category:
साहित्य - ललितवडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती.
Category:
साहित्य - ललितआषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.
Copyright © 2025 | Marathisrushti