रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक
Category:
साहित्य - ललितलहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते.
Category:
साहित्य - ललितलहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते.
Category:
साहित्य - ललितमुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.
Category:
साहित्य - ललितकपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे.
Category:
साहित्य - ललितदुसऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी करताना एखाद्या गुन्हेगाराने क्रौर्याची परिसीमा ओलांडण्याचे प्रकार पोलिस अनेक वेळा पाहतात.विशेषतः जातीय दंगलीमध्ये त्याचे जास्त अनुभव येतात. मात्र समोरच्या व्यक्तीच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन तिचा सातत्याने छळ करत राहणे ही विकृतीच. त्यातूनही एका स्त्री स्वभावात तिचे दर्शन होणे हे आणखी क्लेशदायक. १९९८ मधे दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असतानाची ही कथा.
Category:
साहित्य - ललितसर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली.
Category:
साहित्य - ललितएक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर….
Category:
साहित्य - ललितप्रत्येक स्त्रीला विचारले कि तुझे आवडते गाव कोणते? तर तिच्या तोंडून अगदी सहजपणे माहेरच्या गावचेच नाव येईल. मीही त्याहून काही वेगळी नाही. “स्वर्ग जरी दिला तरी याची तोड नाही, माहेरच्या गावची सर कशातच नाही”. हेच खरे. मुंबई पुण्याच्या मध्ये असलेले माझे कर्जत. भरभरून निसर्गाची कृपा असलेले माझे कर्जत. जेष्ठ साहित्यिक कै. राम गणेश गडकरी, कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं लाडकं कर्जत.
Category:
साहित्य - ललितगी द मोपासॉ च्या A SALE या कथेवर आधारित.
Category:
साहित्य - ललितहल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. ….
Copyright © 2025 | Marathisrushti