साहित्य - ललित

आईच्या बांगड्या

Category:

 

क्रांतीच्या वेळी आई मुलाला म्हणाली वाणाचं सामान आणायचे आहे पैसे देतोस का मुलानी काही रुपये काढून दिले. अरे आणखीन थोडे देतोस का बांगड्या भरायच्या आहेत मला. बांगड्या आहेत ना हातात. आई मान खाली घालून गप्प. आणि तसेही बांगड्या घातल्या शिवाय सण साजरा होत नाही का? आई मुकाट्याने बाहेर गेली. तोच चला मी तयार आहे मला साडी घ्यायची आहे सणासाठी. आणि आई थोड्याच दिवसा नतंर बांगड्या न भरताच या जगातून निघून गेली.

साहित्य - ललित

गझल गायनाला शुभारंभ

Category:

 

लवकरच रेडिओवर तीन मराठी गाणी सादर करण्याचे कॉन्ट्रॅक्ट माझ्या घरी आले आणि गाणी घेऊन मी रेडिओच्या ऑफिसमध्ये गेलो. संगीतकार भूमानंद बोगम यांची भेट झाली आणि या पूर्वी कोणत्याही कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी सादर करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

साहित्य - ललित

रथसप्तमी आहे आंनदाची

Category:

 

रथसप्तमीला संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाची सांगता होते. आज सूर्य रथात बसून जात आहे अशी रांगोळी काढून त्यासमोरील बाजूस गोवरीच्या खांडावर छोट्या मातीच्या सुगड्यात दूध उतू घातले जाते आणि ते पूर्वेकडील बाजूस उतू जाणे शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशीचे औचित्य साधून लेकीने घरसजावटी बरोबरच सूर्य रथाची आरास केली आहे.

साहित्य - ललित

रम्य ते बालपण : चित्तरंजन भट

Category:

 

नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच.

साहित्य - ललित

हिमशिखरांच्या सहवासात – प्रस्तावना

Category:

 

भारताच्या वायव्येकडे पसरलेल्या हिंदुकुश आणि काराकोरम या पर्वतरांगांपासून पार अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत पसरलेल्या हिमालय या पर्वताचे जगभरच्या लोकांना अपार कौतुक आणि आकर्षण आहे. या आकर्षणापोटी गेली हजारी वर्षे जगभरचे अनेक प्रवासी या पर्वतांत प्रवासासाठी येतात. हिमालयात भटकंती करायला येणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने चार पाच वर्ग पडतात. काही लोकांना हिमालयाचा अभ्यास करायचा असतो, हिमालयाची भौगोलिक जन्मकथा अतिशय रंजक आहे.