साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५३ – अजीजन बाई

Category:

 

अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५२ – महाराणी जिंद कौर

Category:

 

दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५० – सरला देवी चौधरानी

Category:

 

१५० वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तोडायचे होते, सोपं नक्कीच नव्हतं. लोकांची मानसिकता बदलायची होती, सोपं नक्कीच नव्हतं. आपण पारतंत्र्यात आहोत हे जन-मानसात रुजवायच होतं, सोपं मुळीच नव्हतं. एखाद्या शत्रूची आधी तो आपला शत्रू आहे म्हणून जाणीव करून देणे गरजेचे आणि मग त्याच्याविरुद्ध लढा. काम कठीण होतं, पण आपण भारतीय आहोत, मुळातच चिवट असतो, तेच आपल्या आधीच्या पिढीने केले, वेग-वेगळ्या पद्धतीने जन-जागरण. सरला देवी चौधरानींनी गाण्याच्या माध्यमातून, साहिताच्या माध्यमातून देशातील काना कोपरयात स्वातंत्र्य संग्राम पोचवला.

साहित्य - ललित

उगाच काहीतरी -३ (बिस्किट्स नॉस्टॅल्जिया)

Category:

 

हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ४९ – कुट्टी मालू अम्मा

Category:

 

१९३२ साली असहकार आंदोलन,सविनय कायदा भंग ह्या सगळ्यात त्यांनी भरपूर काम केले. एक मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यात कुट्टी मालू ह्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व देखील केले त्यावेळी त्यांची मुलगी केवळ दोन महिन्यांची होती. इंग्रजांचे दडपशाही चे धोरण सर्वश्रुत आहेच. त्यांनी महिला, मुलं, अबाल-वृद्ध काहीच बघितले नाही आणि सगळ्यांना देशद्रोही म्हणून कारावासात टाकणे सुरू केले. कुट्टी मालू ह्यांना सुद्धा २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली, त्यांच्या दोन महिन्यांच्या तान्हुली बरोबर त्यांनी कारावास भोगला. प्रत्येक चळवळ जी भारताला स्वातंत्र्य देऊ शकेल अश्या सगळ्यात कुट्टी मालू ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, मग ते सविनय कायदे भंग, असहकार आंदोलन किव्हा चले जाव चळवळ. प्रत्येकवेळी त्याची शिक्षा ही ठरलेली, कारावास कालावधी फक्त वेगळा होता. कारावसातून सुटून आल्यावर त्या अजून जोमाने कामाला लागायच्या.