साहित्य - ललित

संस्कृत भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे

Category:

 

मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा

साहित्य - ललित

जळतं आहे प्रजासत्ताक

Category:

 

जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात

मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.

माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी

माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत

मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील

डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल…

साहित्य - ललित

ययाति/ययातिच्या मनातिल द्वंद्व

Category:

 

भोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व

साहित्य - ललित

तुम्हीच ठरवा, तुमचे जग कसे असावे?

Category:

 

आपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू.