25-M-05
मन एक पाखरू
Category:
साहित्य - ललितमन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान…..
भक्ती
Category:
साहित्य - ललितमाझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही.
रिमझिमणारा पाऊस…….
Category:
साहित्य - ललितपहिल्या पावसाची सरी धर्तीवर पडावी अन् सबंध आसमंत मातीच्या कस्तुरी गंधात न्हाऊन जावा.पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची तुष्णा शांत व्हावी ,उन्हाच्या तापाने सोकलेली झाले पावसाची सरी येताच टवटवीत झालेली ,असा संजीवनी देणारा पाऊस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा .असा हा बहुरंगी पाऊस सृष्टीला फुलवणारा, लपून बसतो मनाच्या गाभाऱ्यात
आयुष्याचे शेवटचे पान….
Category:
लेखसंग्रहम्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पण वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये म्हातारपण म्हणजे भिजलेल्या पापण्याचेच का असते ? हृदयात असंख्य दुखाचे आसवे का वाहतात ?शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुल्क्षित करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा
बंधन (बॉण्ड) – (एक कथा)
Category:
साहित्य - ललित“अहो पण! लोक काय म्हणतील? पहिल्या बाळंतपणाला लेकीने आईकडे यायचं तर आईच लेकीकडे जाऊन राह्यली. आता सगळयांना हे सांगत फिरायचं का की माझ्या लेकीलाच इकडे यायचं नाही?” काल तिला आर्याने तसं सांगितल्यापासून सुलभाची चिडचिड सुरु झाली होती. आर्या सुलभाची मुलगी पहिल्यांदा प्रेग्नन्ट होती. सातवा लागला म्हणून सुलभाने माहेरी आणायचा विषय काढला तर तिने, तुच इकडे ये म्हणून सुलभाला सकंटात टाकलं होतं.
जीवन ऋतु आनंदाचा….
Category:
साहित्य - ललितउगाच कोणाच्या येण्याची प्रतिक्षा करित बसु नये, हा जिवनॠतू आहे क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने लढत जीवनावर भरभरून लिहिणारे महान लेखक होऊन गेले , आजही तेवढ्याच नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते.
जैत रे जैत
Category:
साहित्य - ललितगो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा.
छंद
Category:
साहित्य - ललितप्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं.