साहित्य - ललित

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

Category:

 

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते.

लेखसंग्रह

समर्पितांच्या सहवासात….

Category:

 

मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते.

लेखसंग्रह

स्नेहवन

Category:

 

फार पूर्वी चिरंजीवांवर “देण्याचा” संस्कार व्हावा या हेतूने मी आणि माझ्या पत्नीने त्याच्या व्रतबंधाच्यावेळी त्याच्या हस्ते काही सामाजिक कार्य केले होते. काल मी स्वतःवर संस्कार करून आलो.

लेखसंग्रह

चार’ असतात ‘पक्षिणी’ त्या ! रात असते ‘कायमची’ वादळी !!

Category:

 

कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी !

लेखसंग्रह

मिलते हैं फिर !

Category:

 

मिलते हैं फिर ! रात्री झोपताना स्वतःला हे आश्वासन देऊन झोपण्याची माझी सवय आहे. आणि सकाळी डोळे उघडले की चक्क स्वतःशी भेट होते. पण हे वाक्य दरवेळी इतकं सहजी सत्यात येत नाही.

साहित्य - ललित

तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ!

Category:

 

राज कपूरच्या “हिना” मध्ये छान ओळी होत्या- “मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं !” त्याच धर्तीवर आजच्या पोस्टचे शीर्षक !

साहित्य - ललित

महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे !

Category:

 

स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय.

साहित्य - ललित

नवं -जुनं !

Category:

 

अनेक वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना वंदना चित्रपटगृहात आमिरचा “सरफरोश “बघितला होता आणि तेथील नैसर्गिक उकाड्यात इतका उबलो की तो चित्रपट आत पोहोचलाच नाही. नंतर काही वर्षांनी दूरदर्शनवर पाहिला आणि चक्क आवडला.

साहित्य - ललित

शरणपत्रे!

Category:

 

राजकारण्यांनी जेव्हापासून शिक्षकांना पदरी नोकरीला ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून शिक्षकांनी शरणपत्रे लिहून द्यायला सुरुवात केली. पुराणकाळात सुरुवात झाली द्रोणाचार्यांपासून ! त्यांना धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांसाठी – कौरव-पांडवांसाठी गुरु (शिक्षक) म्हणून नेमले. आणि मग द्रोणाचार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात (कदाचित) मनाविरुद्ध ओढले गेले-राजनिष्ठेचे पालन म्हणून !

लेखसंग्रह

संत संगती

Category:

 

संत एकदा आपल्या वाट्याला आले की ते “जेथे जाऊ तेथे” सतत सोबत करत असतात- हरीप्रसाद /किशोर/उस्मान च्या रूपात ! मग वेगळ्या दर्शनाची, वारीची गरज पडत नाही. ते असतातच!