साहित्य - ललित

शब्द, शब्द, शब्द, शब्द!

Category:

 

गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय.

लेखसंग्रह

साखराळे स्मरणरंजन- काही assorted आठवणी !

Category:

 

त्या सात वर्षांच्या काळात बरंच काही घडलं ,घडवून आणलं. त्याची संगीताच्या भाषेत ही Medley ! खरं तर यातील प्रत्येक अनुभवावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल पण-

लेखसंग्रह

५ सप्टेंबर ! शिक्षक दिन !!

Category:

 

जेंव्हा शिक्षक नव्हतो तेंव्हा ” प्रशिक्षक (ट्रेनर ) झालो. प्रक्रिया थोडीफार तीच ,पण आवडली. शिक्षक बनून- learning तर प्रशिक्षक बनून unlearning followed बाय relearning ! फरक काय तो एवढाच !

लेखसंग्रह

चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

Category:

 

भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).

लेखसंग्रह

२८ मार्च १९९३ – मु.पो.साखराळे

Category:

 

माझे पहिले-वहिले पुस्तक ” माणूस नांवाचे निगेटिव्ह वर्तुळ ” (एकांकिका-संग्रह) आमच्या महाविद्यालयाच्या नवनिर्मित सेमिनार हॉल मध्ये प्रकाशित झाले. महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या मराठी पुस्तकाचे “अभियांत्रिकी” महाविद्यालयात प्रकाशन व्हावे,हे दुर्मिळ ! बहुधा त्या सेमिनार हॉलमध्ये मी साखराळे सोडल्यावर असा युनिक साहित्यिक कार्यक्रम पुन्हा झाला नसावा.

लेखसंग्रह

कापूसखेड नाका, स्टाफ क्वार्टर नं ३/४

Category:

 

आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे.

लेखसंग्रह

माझ्या मामाचं पत्र “हरवलं”

Category:

 

“कुठे नेऊन ठेवलीय आमची शिक्षण व्यवस्था ” असं त्राग्याने म्हणणारे माझे मन क्षणार्धात शांत झाले. आज विषण्णपणे, उद्वेगाने हे आठवलं कारण १९८४ पासून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करीत असल्याने त्या क्षेत्राची सतत घसरगुंडी होत असल्याचे अनुभवत आहे.

लेखसंग्रह

वाढदिवस !

Category:

 

लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे.

लेखसंग्रह

अलिप्त आणि तटस्थ

Category:

 

आज विद्या सिन्हाची स्मृती डोकावली – रजनीगंधा, छोटीसी बात वाली ! पण तात्काळ कवाडे बंद करत मी अलिप्त /तटस्थपणा चेहेऱ्यावर विणला. थोडासा विलगलो पण आठवणींचे पार पिच्छा सोडत नाहीत.नेमाने उगविले-मावळले त्याच्यासारखे तर कदाचित जमेल. प्रयत्न करून बघावे म्हणतोय.

लेखसंग्रह

झापडं !

Category:

 

माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे.