साहित्य - ललित

खांदा

Category:

 

एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त.

साहित्य - ललित

आदर्श

Category:

 

थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)

कथा

फुलपुडी

Category:

 

बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही ..

कथा

रविवार बंद

Category:

 

मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे.

साहित्य - ललित

प्रदर्शन

Category:

 

जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जोडपं “गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन” बघण्यासाठी गेलं. तसं पूर्वी जाणं व्हायचं बरेचदा तेव्हा त्याचं इतकं काही कौतुक वाटायचं नाही पण या मधल्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे चार माणसांत फिरायला जाणं दुर्लभ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाला जाण्याचा आज एक वेगळाच उत्साह होता. त्याच आनंदात दोघेही आत शिरले. सगळे तसेच पूर्वीसारखे स्टॉल. तीच लगबग. अनेक महिन्यांनी जुनं चित्र डोळ्यासमोर बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. स्टॉलच्या दोन रांगांमधलं किंचितसं वाढलेलं अंतर आणि काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पूर्वीसारखंच .

साहित्य - ललित

कोणे एकेकाळी घडले रामायण (सुमंत उवाच – 136)

Category:

 

एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात

साहित्य - ललित

श्रवण भक्ती ज्याची अपार (सुमंत उवाच – 135)

Category:

 

शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.”

साहित्य - ललित

प्राणा चे प्रमाण ठरवू नये (सुमंत उवाच – 134)

Category:

 

प्रमाण हा शब्दच मुळी लोकं प्रमाणात स्वीकारत नाहीत. काही गोष्टी प्रमाणाबाहेर केल्या जातात, प्रमाणात न करता प्रमाण न राखता त्यांचा अतिरेक होतो.

साहित्य - ललित

थंडी ‘मुंबईची’

Category:

 

काय गं ss आलीस का एकदाची ? वाटच बघत होतो तुझी केव्हापासून …. तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो …. त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू ..

साहित्य - ललित

कोण झोपला उन्हापर्यंत

Category:

 

नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो.