लेखसंग्रह

रामायणाचे महत्व !

Category:

 

 रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.

लेखसंग्रह

नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड ॥

Category:

 

स्वामी भक्तांनी, फसव्या व बाजारू लोकांपासून नेहमीच सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी. असा संदेश आपल्याला आजच्या अभंगातून मिळणार आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांच्या नावे श्रद्धेचा बाजार मांडून स्वामी भक्तांना लूबाडण्याचे काम तर केलेच आहे, शिवाय स्वामींचा ही खुप मोठा अक्षम्य अपराध केला आहे. अशा कपाळकरंट्या व स्वामी सारखे शाश्वत सत्य सोडून ईतर तुच्छ गोष्टिंच्या मागे लागलेल्या मतिभ्रष्ट लोकांना ही यापासून परावर्तीत करण्याचा प्रांजल प्रयत्न आनंदनाथ महाराजांनी आपल्या पुढील अभंगातून केला आहे.

लेखसंग्रह

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

Category:

 

आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि.

लेखसंग्रह

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

Category:

 

सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे.

लेखसंग्रह

ब्लादिमीर लेनिन आणि नाशिक ते मंत्रालय !

Category:

 

आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.

लेखसंग्रह

सेकंड इनिंग

Category:

 

आपण जसे आपल्या पहिल्या ‘ इनिंग ‘ कडे ,- म्हणजे शिक्षण , नौकरी -व्यवसाय , लग्न – या कडे जसे लक्ष देतो तसे आपल्या ‘ सेकंड इनिंग ‘ कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य . या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते . ‘वेळ आल्यावर पाहू ‘ ‘ आत्ताच काय घाई आहे ?’ म्हणून टाळून देतो .

लेखसंग्रह

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

Category:

 

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.

कायदा आणि गर्भवती स्त्रिया
लेखसंग्रह

कायदा आणि गर्भवती स्त्रिया

Category:

 

गर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ?

लेखसंग्रह

काटकसर

Category:

 

आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!