कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी
Category:
लेखसंग्रहशेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का?