लेखसंग्रह

इमारतीचे आरेखन करताना कशाचा विचार केला जातो?

Category:

 

सर्वप्रथम इमारतींची संरचना करताना कशा कशाचा विचार करावा लागतो ते बघूया. वास्तुरचनाकार(आर्किटेक्ट) वास्तू आरेखन तयार करून स्ट्रक्चरल अभियंत्याला देतात, तेव्हा त्या इमारतीवरील संभाव्य वजनाचा प्रथम विचार केला जातो. यात भिंतींचा आकार, त्या मातीच्या विटांनी बांधणार की हलक्या विटांनी, म्हणजे त्यांचे वजन, छपराचे वजन, प्लास्टरचे वजन, फरशीचे वजन, बाह्य सजावटीचे वजन, इतर वजन, असा सर्व तपशील एकत्र केला जातो.

लेखसंग्रह

भूकंपरोधक वास्तूरचनेबाबत मार्गदर्शन कोठे मिळेल?

Category:

 

अलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत.

लेखसंग्रह

भूकंपरोधक इमारतीच्या निर्मितीत कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे?

Category:

 

इमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये.

लेखसंग्रह

वूड, प्लायवूड या लाकडांच्या प्रकारात काय फरक असतो?

Category:

 

लाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.

लेखसंग्रह

व्हिनिअर, एमडीएफ आणि मरीन प्लाय म्हणजे काय?

Category:

 

लाकूड निरनिराळ्या प्रकारचे असते. सागवान, ओक, आंबा, साल, देवदार आदी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडात विविध गुणधर्म असतात. सागाचे लाकूड सगळ्यात मजबूत तर देवदारचे लाकूड सगळ्यात कमजोर असते. त्यामुळे ते पॅकिंगच्या खोक्यासाठी वापरतात. साहजिकच त्यांच्या किमतीही कमी जास्त असतात. म्हणून प्लायवूड बनविण्यासाठी कमी किमतीच्या लाकडाचा भुसा वापरतात, पण तो हवा आणि बाष्पामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून त्यावर टिकाऊ सागापासून बनविलेले ०.२५ मिमीसारखे अत्यंत पातळ पापुद्रे ऊर्फ प्लाय फेव्हिकॉलने चिकटवले जातात.

लेखसंग्रह

II समर्थांची प्रार्थना II

Category:

 

समर्थ रामदासा ,
प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत !
मला शक्ती दे, सामर्थ्य दे !
मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे !

साहित्य - ललित

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

Category:

 

भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?)

साहित्य - ललित

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

Category:

 

“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.

साहित्य - ललित

अनवट-सीता रामम !

Category:

 

१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव.

लेखसंग्रह

ग्राहक “हितैषी (?)”

Category:

 

आज सकाळी नाभिकाकडे (Hair Cutting Saloon) डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी गेलो होतो. नेहेमीचा नाभिक, नेहेमीचे माझे वाढणारे केस आणि नेहेमीचा मी ! पण आज त्याच्याकडे (बहुधा)नवा कारागीर (हा त्यांचा आवडता शब्द असतो) असावा. उत्साहाच्या भरात बागडत,मला इंप्रेस करण्यासाठी असावे कदाचित, तो हातातील कैचीइतकाच जिभेनेही कार्य करीत होता.