लेखसंग्रह

सलोह काँक्रीटची तपासणी

Category:

 

एकदा काँक्रीटचे बांधकाम पुरे होऊन काही वर्षे उलटली की त्याच्या तपासणीची गरज पडते, कारण १) कोणत्याही शहरी विभागात काँक्रीटचे कोणतेही बांधकाम १५ वर्षे उलटली की महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी करणे बंधनकारक असते. २) अशी तपासणी तज्ज्ञांकडून करवून घेऊन ती सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्रथम १५ वर्षांनी आणि नंतर 15 कुतूहल दर पाच वर्षांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे.

लेखसंग्रह

प्राचीन बांधकामाची वैशिष्ट्ये

Category:

 

राजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत.

लेखसंग्रह

गगनचुंबी इमारतींना आधार कशाचा?

Category:

 

आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.

लेखसंग्रह

इमारतींमध्ये खांब असावेत का?

Category:

 

एका देवळात हरदासबुवांचे संध्याकाळी सहा वाजताचे कीर्तन ऐकायला लोक पाच वाजल्यापासूनच येऊन बसत. हरदासबुवांना वाटले त्यांचे कीर्तन फारच श्रवणीय असल्याने लोक अगोदरपासून येऊन बसतात. थोडी चौकशी केल्यावर समजले की देवळात असलेल्या खांबाना टेकून बसता यावे म्हणून लोक अगोदरपासून येऊन बसतात. त्यावरून कोणीतरी | विचारले की बिनखांबांचे अथवा खांबच खांब असलेले बांधकाम शक्य आहे का? इमारतीचे बांधकाम दोन पद्धतीने होते.

लेखसंग्रह

कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया यात फरक काय?

Category:

 

आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.

लेखसंग्रह

आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे?

Category:

 

आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे? घर १९५०-६० सालापर्यंत लोक काँट्रक्टरला बोलावून घरे बांधीत.आर्किटेक्टकडून घराचा नकाशा बनवून घ्यावा हे तोपर्यंत फारसे प्रचलित झाले नव्हते. तेव्हा मुंबईचे जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोडता महाराष्ट्रात अन्यत्र जवळ जवळ अशी महाविद्यालयेही नव्हती. आर.एस. देशपांडे यांच्या घरबांधणीवरील पुस्तकात घरांचे चार-पाच नमूने दिले होते, त्याबर हुकूम काँट्रक्टरकडून (जो मुळात गवंडीच असे) बांधून घेतले जाई.

लेखसंग्रह

गगनचुंबी इमारतीसाठी पायाची खोली कशी असते आणि ती कशी ठरवतात?

Category:

 

पाया चांगला असला की इमारत चांगलीच होणार. कुठल्याही गोष्टीत पायाला फार महत्व आहे, मग ते आपले जीवन असो की इमारत. चांगल्या संस्कारांच्या पायावर जसे समृध्द जीवन जगता येते, तसेच भक्कम पायाच्या आधारे इमारती पण टिकून राहू शकतात.

लेखसंग्रह

स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणजे कोण?

Category:

 

एखादी इमारत बांधायला घ्यायची म्हणजे बऱ्याच जणांची मदत लागते.जसे,तयार इमारतीची विविध दालने कुठे, कशी असावीत हे आर्किटेक्ट ठरवतात. त्यांच्या नकाशाला आर्किटेक्चरल फ्लॅन आणतात.आर्किटेक्चरच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या इमारतीचा एक सांगाडा तयार करावा लागतो. त्याला बरेच खांब (कॉलम्स) आणि तुळया (बीम्स) असतात. संपूर्ण इमारत या खांब आणि तुळयांनी पेललेली असते.

लेखसंग्रह

अंतर्गत बदल करताना तुळया खांब काढणे कितपत श्रेयस्कर?

Category:

 

बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो.

लेखसंग्रह

स्ट्रक्चरल ऑडीट म्हणजे काय? ते किती वर्षांनी करावे?

Category:

 

खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप कठीण काम आहे.