स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,

स्वप्न मजला आवडते भावते

कल्पनेचे राज्य जरी,

आनंददायी वाटते....II धृ II

तव प्रतिमा मनी बसवली,

आठवण सदैव येऊ लागली ।

जागेपणी मिळे न मजला,

स्वप्नी सारे तेच अनुभवते.......१

स्वप्न मजला आवडते ,

पूर्णत्वाचे सुख आगळे,

जीवन प्रवाही येती अडथळे ।

हवे हवेसे मनी ठरवी ते,

केवळ स्वप्नची मिळवूनी देते....२

स्वप्न मजला आवडते ,

कल्पना, भाव- तरंगे उठूनी,

रात्री गेल्या कित्येक रंगूनी ।

क्षणीक असूनी भ्रामक जरी,

स्वप्न दिलासी देवून जाते....३

स्वप्न मजला आवडते,

विश्वपसारा मायेचा हा,

जीवन गुंता दिसतो पहा ।

किरण आशेचे त्यात चमकूनी,

स्वप्न हे वरदान ठरते....४

स्वप्न मजला आवडते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,

स्वप्न मजला आवडते भावते

कल्पनेचे राज्य जरी,

आनंददायी वाटते….II धृ II

तव प्रतिमा मनी बसवली,

आठवण सदैव येऊ लागली ।

जागेपणी मिळे न मजला,

स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१

स्वप्न मजला आवडते ,

पूर्णत्वाचे सुख आगळे,

जीवन प्रवाही येती अडथळे ।

हवे हवेसे मनी ठरवी ते,

केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२

स्वप्न मजला आवडते ,

कल्पना, भाव- तरंगे उठूनी,

रात्री गेल्या कित्येक रंगूनी ।

क्षणीक असूनी भ्रामक जरी,

स्वप्न दिलासी देवून जाते….३

स्वप्न मजला आवडते,

विश्वपसारा मायेचा हा,

जीवन गुंता दिसतो पहा ।

किरण आशेचे त्यात चमकूनी,

स्वप्न हे वरदान ठरते….४

स्वप्न मजला आवडते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author