अनेक शाळा अभ्यासक्रमावर आधारित आशय शिकविण्याचा प्रयत्न करतात. वर्गातील प्रचंड विद्यार्थी संख्येमुळे अभ्यासक्रम शिकवणे ही शिक्षकांना नेमून दलेली कामगिरी असते. त्यामुळे अभ्यासक्रमाबाहेरचे शिकविण्यावर व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार त्यांना वाव देण्यासाठी शिक्षकांकडे वेळही नसतो. त्यामुळे एक चाकोरीबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षक करू शकतात.
अनेक विद्यार्थ्यांना आपल्यातले सुप्त गुण, आवड, कल, वृत्ती ओळखता येत नाही. सुप्तगुण ओळखू आले तरीही सुप्त गुणांना वाव देण्यासारखी परिस्थिती शाळेतही नसते व कुटुंबातही नसते. शाळेच्या बाहेरच अनेकांचे सुप्त गुण बहरले आहेत. अनेकांना शाळेनी ओळखलेच नाही. सचिन तेंडुलकर शाळेला ओळखता आला नाही, त्याने स्वतःच्या हिंमतीवर प्रचंड कष्ट करून स्वतःचे स्थान निर्माण केले. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा पैसा मिळवून विद्यार्थ्यांसाठी पैसा फंड कलादालनांसाठी उभे करतात. शाळेत विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे शिक्षक भविष्या काळासाठी दिशादर्शकच ठरतात. संगमेश्वर येथे अशाच प्रकारच्या शाळेत एक कलादालन आहे जे अप्रकाशित हिरऱ्यांना पैलू पाडतं. समाजासाठी काहीतरी करण्याचा हा विचारच किती महत्व पूर्ण आहे. प्रामाणिक हेतूं मनात ठेवून काम केल्यावर किती उत्तुंग यश मिळतें हे शाळेकडे पाहून कळते.
शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. फक्त अभ्यासच नाही तर मुलांमधील कलागुण हेरून खेळ, चित्रकला यांना सुद्धा प्रोत्साहन दिले जाते, कलेचा अभ्यास इथे पाहायला मिळतो. मुलांमध्ये असलेले अंगभूत कलागुण कोकणातल्या या छोट्या छोट्या गावातही असतात हे शाळेला लक्षात आले आणि मग शाळेने मुलांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले, त्यातून स्वतंत्र कला वर्गाची स्थापना केली आणि त्यांचा चांगलाच फायदा झाला. शाळेचे अनेक विद्यार्थी कला महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन आता त्या क्षेत्रात स्थिरावले आहेत. कला वर्ग हा विद्यार्थ्यांच्या श्रमदानातूनच उभा राहिला आहे.
‘व्यापारी पैसा फंड’ या संस्थेची ही शाळा १९२९ पासून, सुरू आहे. संगमेश्वरमधील व्यापारी वर्गाने खेडोपाडी, अगदी वाडी-वस्तीवर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने ती शाळा उभारली. त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या नफ्यातील ठरावीक हिस्सा ‘शैक्षणिक फंड’ म्हणून गोळा केला. फक्त आपला स्वार्थ न पाहता समाजासाठी काहीतरी करण्याचा हा विचारच किती प्रेरणादायी आहे! असा प्रामाणिक हेतू मनी ठेवून काम केल्यावर किती उत्तुंग यश मिळते, हे शाळेकडे पाहून कळते.
आजही या शाळेचा नावलौकिक तसाच आहे. तेथे मुलांना तळमळीने शिकवले जाते. त्या मुलांनाही आयुष्यभर शाळेबद्दल आत्मीयता वाटते. शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. फक्त अभ्यासच नव्हे; तर मुलांमधील कलागुण हेरून खेळ, चित्रकला यांनासुद्धा प्रोत्साहन दिले जाते. खरेतर, शहरातील पालकांना मुलांच्या अभ्यासाइतके त्यांच्या इतर कलागुणांचे महत्त्व वाटत नाही. मग खेड्यात तर विचारायलाच नको. कलेचा अभ्यास करूनही अर्थार्जन होऊ शकते, हे त्या पालकांच्या गावीच नसते, पण अंगभूत कलागुण असणारी अनेक मुले कोकणातील छोट्या-छोट्या गावी आहेत. हे शाळेच्या लक्षात आले. मग शाळेने मुलांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले. त्यातून स्वतंत्र कलावर्गाची स्थापना केली. त्याचा चांगला फायदा झाला. शाळेचे अनेक विद्यार्थी कला महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन आता त्या क्षेत्रात स्थिरावले आहेत.
‘संस्थेला नेहमी असे वाटत होते, की पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपले विद्यार्थी कोठेतरी कमी पडतात. त्यांना काहीतरी विशेष मार्गदर्शन केले पाहिजे म्हणून शाळेने स्वतंत्र कलावर्गाची उभारणी केली. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. मुलांना चित्रकलेची गोडी तर लागली; पण ती वाढायला अजून काय करता येईल, असा विचार शाळा सतत करत होती. मग मुलांशी केलेल्या चर्चेतून ‘कलासाधना’ या वार्षिक अंकाची निर्मिती झाली. दरवर्षी पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्तम चित्रे घेऊन कलासाधनाचा अंक तयार होत असतो, त्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना दाखवायला अनेक चित्रांचे संग्रह झालेच; पण त्या अंकात त्यांचे चित्रही असावे यासाठी मुले मनापासून प्रयत्न करू लागली ‘हा कलावर्गही विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभा राहिला आहे. मुलांची कला पाहून देणगीदारांनीही देणग्या दिल्या व २००८ – २००९ मध्ये स्वतंत्र कलावर्ग उभा राहिला. ‘
कलादालनाच्या प्रवेशद्वारासमोर, एक अप्रतिम थ्री-डी चित्र व फ्फायबरची नऊ फूट उंचीची एक पेन्सिल आहे. ‘कोविडचे संकट आले आणि मुले शाळेत यायची बंद झाली. त्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून कलाविभागाने शाळेमध्ये आर्ट गॅलरी उभी करण्याचे ठरवले. संस्थेनेदेखील प्रोत्साहन देत त्या विचाराला संमती दिली. फक्त शाळेला नाही, तर गावाला अभिमान वाटावा असे काम संस्थेने करायचे ठरवले. ‘
या भव्य कामात शाळेचे माजी विद्यार्थी, दानशूर मंडळी, कलाविकासासाठी काम करणाऱ्या समाजिक संस्था अशा सर्वांची मदत झाली. ‘
शाळेचे जी. डी. आर्ट झालेले माजी विद्यार्थी हेमंत सावंत व प्राची रहाटे यांनी मनापासून प्रयत्न करून कलादालनासाठी चित्रे मिळवली. कारण चित्रे विकत घेणे शाळेला परवडण्यासारखे नव्हते. त्या दोघांच्या प्रयत्नाने अनेक प्राध्यापक, युवा कलाकार यांची चित्रे तर मिळाली, पण त्यांनी नऊ शिल्पेही दालनासाठी मिळवून दिली. ए. टी. डी. झालेल्या स्नेहांकित पांचाळ याने शिल्पांसाठी चौथरे बनवून देण्याची जबाबदारी घेतली. युवा कलाकारांच्या चित्रांची विक्री करून त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे संस्थेने ठरवले आहे.’ संस्थेचे कला शिक्षक जितेंद्र पराडकर यांना निसर्ग पर्यावरण, पर्यटन स्थळे व मंदिरे यांच्या बद्दल जिव्हाळा आहे.
विद्यार्थ्यांमधील वेगवेगळे कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्यांच्या शाळा उघडणे आवश्यक आहे. दहावी व बारावी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यं व मूल्यां वर आधारित दृष्टिकोन रुजत नसेल तर त्या अभ्यासक्रमाचा त्याला काही फायदा होत नाही.
केवळ पुस्तकी ज्ञान आयुष्यात कामाला येत नाही. पुस्तकातली मूल्यं, पुस्तकातली कौशल्य, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विचार करताना समाजात वावरताना सापडतात.
एकुणच एखादा तरी कौशल्याचा कोपरा शाळेने जपावा फुलवावा म्हणजे शाळा नामांकित म्हणून नक्कीच ओळखली जाईल.
अजून एक शाळासहज शिक्षणाच्या माध्यमातून सुप्त गुणांना वाव देणारी अशीच आहे.