सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना असामान्य पदांवर विराजमान करण्याची किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे सुनील प्रभू. अलीकडेच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती यशवंत ठरली असून पुरेसे संख्याबळ पदरी असल्यामुळे महायुतीचे महापौरपदाचे उमेदवार सुनील प्रभू यांचा विजय निश्चित झाल्यात जमा आहे.
जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर शाळेत आणि त्यानंतर इस्माईल युसूफ महाविद्यालयात कला शाखेत बारावीपर्यंत शिक्षण आणि पुढे औद्योगिक तंत्रशिक्षण पदविका मिळविणाऱ्या सुनील प्रभू यांनी स्थानिक पातळीवरील गटनेते पदापासून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करण्याचे कसब असलेल्या सुनील प्रभू यांची हुन्नरी माजी गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर यांनी हेरली. कीर्तिकरांनी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील काम पाहण्याची सूचना केली. या संधीचे सुनील प्रभू यांनी सोने केले. परिणामी शासन यंत्रणेतील कामकाजाचे धडे त्यांना तेथे मिळाले. हे काम करीत असतानाच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांचे नशीब फळफळले. १९९७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्या वेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. भरघोस मतांनी ते निवडून महापालिकेत गेले. विधानसभा निवडणूक कामाचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे महापालिकेतील कामकाज शिकून घेण्यासाठी त्यांना फारसा अवधी लागला नाही. त्यानंतर महापालिकेच्या सलग चार निवडणुकांमध्ये निवडून येण्याचा मान मिळविला. पक्षाने त्यांच्यावर दोन वेळा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पेलली. त्यापाठोपाठ महापालिका सभागृह उपनेता, स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा तसेच सभागृह नेतेपदाची जबाबदारी प्रदीर्घ काळ सांभाळली. सभागृह नेते असताना विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्यांनी परतवून लावल्या. आता ९ मार्च रोजी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होताच सुनील प्रभू यांच्या शिरावर महापौरपदाचा मुकुट चढणार आहे.
प्रभू, सुनील