शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।

डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।। १

किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।

नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।। २

सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।

निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।। ३

बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।

राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।। ४

निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।

धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।। ५

जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।

विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।। ६

लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।

तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।। ७

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author