आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलुनी आले
निर्माल्याचाही तो गंधाळ सुगंधी
गगन, गतस्मृतींचे दाटुनी आले
सांग सखये, काय काय आठवू
लोचनी, तुझेच भास तरळलेले
खुणा! तुझ्या पावलो, पाऊली
आठव सारेसारे, हृदयी रुतलेले
अजुनही छळतो, तुझा अबोला
मन! अधीर हे तुझ्यात गुंतलेले
लाघवी प्रीती, चैतन्य स्पंदनांचे
मन! तव प्रतीक्षेत घुटमळलेले
आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलूनी आले
— वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र.३८.
७ – २ – २०२२.
Author
Post Views: 14