शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी,

वलये त्यांची होत असती ।

सुविचारांची वलये सारी,

नभाकडे जात दिसती ।।

पवित्र निर्मळ विचारांच्या,

तरल अशा लहरी असती ।

अशुद्ध साऱ्या विचारांची,

जड लहरी तळात राहती ।।

फार पूरातन काळी देखील,

उकल दिसते या गोष्टीची ।

पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,

शोधली जागा शिखरावरची ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



विचारांच्या उठती लहरी,

वलये त्यांची होत असती ।

सुविचारांची वलये सारी,

नभाकडे जात दिसती ।।

पवित्र निर्मळ विचारांच्या,

तरल अशा लहरी असती ।

अशुद्ध साऱ्या विचारांची,

जड लहरी तळात राहती ।।

फार पूरातन काळी देखील,

उकल दिसते या गोष्टीची ।

पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,

शोधली जागा शिखरावरची ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author