शेवळं कोलंबी भाजी

साहित्य: शेवळं, हळद, तिखट, मीठ, हिरवे वाटण | तळलेला मसाला, चिंच, कांदा, कोलंबी

कृती: हिरवे वाटणं- आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे
तळलेला मसाला ( गरम मसाला): कांदा, सुखे खोबरे, लवंग, दालचिनी, काळे मिरे, धणे, वेलची

कृती: प्रथम चिरलेली शेवळं घेऊन गरम पाण्यात पांच मिनिटे उकडणे, काकडं कुकरमध्ये उकडून बिया काढून वाटून घेणे. कोलंबीला हळद, तिखट, मीठ व हिरवे वाटण लावून तेलावर परतवणे. प्रेशर पॅनमध्ये तेल व हगिं घालून नंतर कांदा टाकून त्यावर शेवळे परतवणे. दोन तिन मिनिटानंतर काकडाचा वाटलेला गोळा घालून परतवणे. आता त्यावर हळद, तिखट, मीठ व थोडे हिरवे वाटण घालून परतवणे व पाणी घालून दोन ते तीन शिट्या काढणे. नंतर प्रेशर पॅन उघडल्यावर त्यात तळलेला मसाला, चिंच घालून तळलेली कोलंबी त्यात घालणे व चांगली उकळी काढणे.

- सौ. दिपाली नंदकुमार कुळकर्णी

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. दिपाली नंदकुमार कुळकर्णी

Author