शेवळाची कणी (सोडे घातलेली)

साहित्य: शेवाळ्याच्या ४ जुड्या, कांदे २/३ सुक्या खोबऱ्याचा किस अर्धी वाटी, तेल अर्धी वाटी, चणाडाळीचा भरडा १ वाटी, सोडे पाव वाटी, थोडी चिंच, गुळाचा लहानसा खडा, आलं लसूण गोळी, गरम मसाला २ चमचे, हळद, तिखट, मीठ अवश्यकतेनुसार

कृती: प्रत्येक शेवळाच वरच साल व देठाशी असलेला शेंदरी भाग काढून टाकावा. शेवळं धुवून बारीक चिरुन घ्यावी. १०-१२ काकड कुकरमध्ये शिजवून त्याच्या बिया काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. उभा चिरलेला कांदा व सुख्या खोबऱ्याचा किस थोड्या तेलावर परतून घ्यावा व तो वाटून घ्यावा. चणाडाळ भाजून त्याचा भरडा काढावा. आल लसणाची गोळी घ्यावी. सोड्याचे बारीक तुकडे करुन त्याला हळद, तिखट, मीठ, व लसणाची गोळी लावून ठेवावी.

थोड्या तेलावर चिरलेली शेवळ व वाटलेल्या काकडाचा गोळा, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा थोडा कोळ टाकून परतवून घेऊन कुकर मधून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात तेल टाकून ३-४ लसणाच्या पाकळ्या, कांदा घालून परतावे. गुलाबी झाल्यावर त्यात सोडे चांगले सवताळून घ्यावे. नंतर शेवळाची शिजलेली भाजी, तळलेला कांदा खोबऱ्याचे वाटण, चिंचेचा कोळ, गुळाचा लहानसा खडा, डाळीचा भरडा, गरम मसाला, गरज वाटल्यास थोडे तिखट, मीठ घालून सगळं परतून एकजीव करावे. झाकणात पाणी घालून वाफेवर शिजवत ठेवावे. मधून मधून पाण्याचा हबका मारावा. भाजी मोकळी होईपर्यंत परतून घ्यावी. ही शेवळाची कणी नुसती खाण्यासही चविष्ट लागते.

-सौ. अलका वढावकर

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

Author