शनिवारच साहित्य : कोजागिरी

आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं
रोज कडू लागायचं आज गोड गोड वाटतंय

रंगीत द्रव्य ग्लासा मधलं पांढर आज दिसतंय
आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं

कर्कश्य आवाजातील गाणी आणि चमकणारे दिवे
आज सगळे शांत फक्त शीतल प्रकाशात नाहणे

मैफिलीत आज नाही रोजच्या सारखं दुःख
नाही डोळ्यात नमी नाही पैशाचीही कमी

आज कसं सार काही सोज्वळ थोड वाटतंय
गुलाबाच्या वास पेक्षा मोगरा बरा वाटतोय

एक दोन ग्लासानंतर तारे दिसू लागायचे
आज पूर्ण चंद्र एकटा ग्लासा मध्ये बघायचे

अरेच्चा !! हि तर कोजागिरीची पार्टी चालली दिसती
तरी म्हणतो बाटली ऐवजी किटली का दिसतीय
आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं

-- विनायक आनिखिंडी, पुणे

9922970317



आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं
रोज कडू लागायचं आज गोड गोड वाटतंय

रंगीत द्रव्य ग्लासा मधलं पांढर आज दिसतंय
आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं

कर्कश्य आवाजातील गाणी आणि चमकणारे दिवे
आज सगळे शांत फक्त शीतल प्रकाशात नाहणे

मैफिलीत आज नाही रोजच्या सारखं दुःख
नाही डोळ्यात नमी नाही पैशाचीही कमी

आज कसं सार काही सोज्वळ थोड वाटतंय
गुलाबाच्या वास पेक्षा मोगरा बरा वाटतोय

एक दोन ग्लासानंतर तारे दिसू लागायचे
आज पूर्ण चंद्र एकटा ग्लासा मध्ये बघायचे

अरेच्चा !! हि तर कोजागिरीची पार्टी चालली दिसती
तरी म्हणतो बाटली ऐवजी किटली का दिसतीय
आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं

— विनायक आनिखिंडी, पुणे

9922970317

Author