सत्य प्रीत भावनां

चालता चालता थांबूनी वळणावरी



चालता चालता
थांबूनी वळणावरी
मी हात हलवूनी
खुणावीत असे तुला

दाराशी राहुनी उभी
तुही पाहशीस मला
ती ओढ अनामिक
आजही स्मरते मला

प्रीती! तीच मनस्वी
बेचैन करी जीवाला
प्रीतीत गुंतलेले श्वास
सारे आठविते मनाला

प्रीत केवळ दान भाळीचे
साक्ष, आज मात्र पटली
तू तिथे, अन मी इथे
हा दुरावा छळे अंतराला

झेलले सारे सारे ऋतू
निष्प्राण साऱ्या संवेदना
सत्य! एक प्रीतभावनां
उरली केवळ सांत्वनाला

आजही तूंच लोचनी
मन तुझ्यात गुंतलेले
भास तुझाच सभोवार
सांजाळ पाहता पाहता

©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ११६.

२६ – ८ – २०२१.

Author