सर्व जीवांना जगू द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती ।
किडे नि मुंग्या झुरळे, यांची रेलचेल होती ।।

चिवचिव करीत चिमण्या, येती तेथे ।
काड्या-कचरा आणूनी, घरटी बांधत होते ।।

झाडून घेई हळूवारपणे, तो कचरा ।
भिंती आणि माळ्यावरी ठेवी, तसाच पसारा ।।

स्वातंत्र्याची मुभा होती, झुडपांना तेथे ।
स्वच्छंदानें अंगणी वाढती, सर्व दिशांनी ते ।।

जगणे आणि जगू देणे, ब्रीद निसर्गाचे ।
पाळीत होता तत्व महान, जीवन जगण्याचे ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती ।
किडे नि मुंग्या झुरळे, यांची रेलचेल होती ।।

चिवचिव करीत चिमण्या, येती तेथे ।
काड्या-कचरा आणूनी, घरटी बांधत होते ।।

झाडून घेई हळूवारपणे, तो कचरा ।
भिंती आणि माळ्यावरी ठेवी, तसाच पसारा ।।

स्वातंत्र्याची मुभा होती, झुडपांना तेथे ।
स्वच्छंदानें अंगणी वाढती, सर्व दिशांनी ते ।।

जगणे आणि जगू देणे, ब्रीद निसर्गाचे ।
पाळीत होता तत्व महान, जीवन जगण्याचे ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author