सांगता

तुझी अशी तटस्थता
अन ही, निःशब्दता

सारेच सांगुनी जाते
नित्य तुज आठविता

न केला कधी दुराग्रह
स्वप्नी तुझ्याच जगता

सावरले क्षणाक्षणाला
विरहही तुझा सोसता

विवेकी संयमी जगतो
अश्रु प्राशिता प्राशिता

असे हे भाग्य भाळीचे
झेलितो तुज आठविता

अंतरीचे अस्तित्व तुझे
बळ देते जगता जगता

सरले जरी आयुष्य सारे
तुझ्या आठवात सांगता

-- वि.ग.सातपुते ( भावकवी )

9766544908

रचना क्र. १८०/

२८/७/२०२२



तुझी अशी तटस्थता
अन ही, निःशब्दता

सारेच सांगुनी जाते
नित्य तुज आठविता

न केला कधी दुराग्रह
स्वप्नी तुझ्याच जगता

सावरले क्षणाक्षणाला
विरहही तुझा सोसता

विवेकी संयमी जगतो
अश्रु प्राशिता प्राशिता

असे हे भाग्य भाळीचे
झेलितो तुज आठविता

अंतरीचे अस्तित्व तुझे
बळ देते जगता जगता

सरले जरी आयुष्य सारे
तुझ्या आठवात सांगता

— वि.ग.सातपुते ( भावकवी )

9766544908

रचना क्र. १८०/

२८/७/२०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →