साहित्य : – ४ मोठे चमचे साबुदाण्याचे पीठ (अर्धा तास पाण्यात भिजवावे), ४ चीज क्यूबज् (किसलेले),
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट.
कृती :- वरील सर्व साहित्य एकत्र करून मळावे. लहान लहान चपट्या व गोल आकाराच्या टिक्क्या करून फ्राईंग पॅनमध्ये तेलातून परतून घ्याव्या. दोन्ही बाजूंनी लालसर रंग आल्यास कुरकुरीतपणा येतो. दह्याबरोबर खाण्यास द्याव्यात.
Author
Post Views: 5
