सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या
हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ||

हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी
तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं ||

समजतील दुःखी तुजला , नसता तो तुझा स्वभाव
हासून खेळून आनंदाने , फूलवित रहा भाव ||

जाणून घे स्वभाव सर्वांचे , रमुन जा संसारी
चाली रितीचे पालन करावे, तुझ्याच नव्या घरी ||

आई बाबा दुरावले , बाळगु नकोस खंत
पाहशील आम्हाला, सासू सासऱ्याच्या रुपांत ||

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author