सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ//

बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची

धन दूज्याचे म्हणूनी घेतले
परके त्यासी नाही समजले
बालपणीं जे प्रेम जमविले
क्षणांत मजला तेच मिळाले
भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

खट्याळ भाऊबहीण येथें
दिर नणंद तसेच तेथे
बहीण वहीनी एकच नाते
हट्ट पुरविण्या दुजे नव्हते
पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची //२//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी
सुख वाटले सदैव त्यानीं
मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची //३//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

सासरीं गेले सोडूनी बालपण
दुज्यासाठीं करण्या समर्पण
फुलणें फळणें खरे जीवन
हवे निसर्गा हेच ते धन
माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची //४//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ//

बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची

धन दूज्याचे म्हणूनी घेतले
परके त्यासी नाही समजले
बालपणीं जे प्रेम जमविले
क्षणांत मजला तेच मिळाले
भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

खट्याळ भाऊबहीण येथें
दिर नणंद तसेच तेथे
बहीण वहीनी एकच नाते
हट्ट पुरविण्या दुजे नव्हते
पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची //२//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी
सुख वाटले सदैव त्यानीं
मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची //३//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

सासरीं गेले सोडूनी बालपण
दुज्यासाठीं करण्या समर्पण
फुलणें फळणें खरे जीवन
हवे निसर्गा हेच ते धन
माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची //४//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author