ऋतू हा बरवा, वसंत हा आला,
नवा गंध घेऊन आनंद फुलला.
हिरव्या पानांनी धरित्री नटली,
सुगंधी फुलांनी दिशा मोहरली.
मंद मंद वारे सुरेल गीत गाती,
वनी कोकिळा मधुर स्वर छेडिती.
नभी इंद्रधनू रंग उधळून जाते,
निसर्गात सारी सृष्टी न्हाऊन निघते.
शिवारात डोलती सोन्याची शेते,
श्रमिकांच्या मुखी उमलती हसू फुले.
नदीचे जल गाते प्रसन्न गाणी,
भरुनी जीवनी नवी चेतना आणी.
असा हा ऋतू दे सुखाचीच छाया,
मनी प्रेम, शांती, नवी मंगल माया.
निसर्गा तुझ्या या कृपेचा ठेवा,
सदा लाभो आम्हा ऋतू हा बरवा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
ऋतू हा बरवा, वसंत हा आला,
नवा गंध घेऊन आनंद फुलला.
हिरव्या पानांनी धरित्री नटली,
सुगंधी फुलांनी दिशा मोहरली.
मंद मंद वारे सुरेल गीत गाती,
वनी कोकिळा मधुर स्वर छेडिती.
नभी इंद्रधनू रंग उधळून जाते,
निसर्गात सारी सृष्टी न्हाऊन निघते.
शिवारात डोलती सोन्याची शेते,
श्रमिकांच्या मुखी उमलती हसू फुले.
नदीचे जल गाते प्रसन्न गाणी,
भरुनी जीवनी नवी चेतना आणी.
असा हा ऋतू दे सुखाचीच छाया,
मनी प्रेम, शांती, नवी मंगल माया.
निसर्गा तुझ्या या कृपेचा ठेवा,
सदा लाभो आम्हा ऋतू हा बरवा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 14